आज राज्यभरातील 29 महानगरपालिकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निकालाकडे लागले आहे, जिथे गेल्या 25 वर्षांपासून ठाकरेंची सत्ता आहे. यंदा ठाकरे विरुद्ध महायुती असा थेट सामना आहे. दहा वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत मुंबईचा गड कोण राखणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सेना भवनाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.