मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेला १६० ते १६५ जागा मिळण्याची शक्यता आहे, तर मनसे ४० ते ४५ जागांवर लढणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १५ ते २० जागा मिळतील. मुंबईतील प्रमुख जागांवर मनसेला प्रतिनिधित्व दिले जाणार आहे.