मुंबईत सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखण्यासाठी महानगरपालिकेने कठोर नियमावली जाहीर केली आहे. कचरा टाकणे, थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी शौच करणे किंवा कचऱ्याचे वर्गीकरण न करणे यांसारख्या कृत्यांसाठी आता मोठा दंड आकारला जाईल. मुंबईकरांनी पालिकेला सहकार्य करून शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल.