मुंबईतील देवनार परिसरात निवडणूक भरारी पथकाने कारवाई करत एका कारमधून 2 कोटी 33 लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम एटीएममध्ये भरण्यासाठी नेली जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. देवनार पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून, निवडणूक काळात पैशांच्या गैरवापराला प्रतिबंध घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.