मुंबईच्या घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवण्यासाठी हातात तलवार घेऊन दोन युवक रस्त्यावर फिरत होते. गुरुवारी झालेला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या असल्फा भाजी मार्केट हनुमान मंदिरा शेजारी घाटकोपर येथे शुल्लक भांडणावरून दोघांनी तलवार काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता.