चिपळूणमधील उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. उड्डाणपुलावरील बहादूरशेख नाका येथे शेवटचा आणि सर्वात मोठा ४२ मीटर लांबीचा गर्डर उभारण्याचे काम काल सायंकाळपासून सुरू झाले असून दोन दिवस हे काम पूर्ण व्हायला लागतील असा अंदाज आहे.