मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आजपासून उपोषण सुरू केले आहे. आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात २०० निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी होणार असून, विविध मागण्यांसाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.