मुंबईतील जुहू गांधी ग्राम रोडवर रात्री अक्षय कुमारच्या सुरक्षा वाहनाची ऑटो रिक्षाला धडक बसली. या अपघातात रिक्षाचालक आणि प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अक्षय कुमार आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित आहेत. जुहू पोलिसांनी मर्सिडीज चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.