मुंबई ते तळकोकण सागरी प्रवास आता सोपा होणार आहे. 1 मार्चपासून भाऊचा धक्का येथून विजयदुर्गसाठी नवीन M2M फेरी सेवा सुरू होत आहे. अवघ्या सात तासांत हा प्रवास पूर्ण होईल. शिमगा आणि गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरेल. मंत्री नितेश राणे पहिल्या प्रवासात सहभागी होणार आहेत.