कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये महिला डब्यात पुरुष फेरीवाल्यांची बिनधास्त घुसखोरी होत असल्याने महिला डबा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. याबाबत सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला असून पाय ठेवायलाही जागा नसतानाही फेरीवाले बिंदास डब्यात शिरत असल्याचं यात दिसत आहे. विशेष म्हणजे महिला डब्यात सुरक्षा रक्षक गैरहजर असल्याने महिला प्रवासी संतप्त