मुंबईच्या महापौरपदी भाजपचा उमेदवार विराजमान होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर महापौरपदाचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे. शिंदेंच्या शिवसेनेलाही महानगरपालिकेत सन्मानपूर्वक पदे मिळतील. यासंदर्भात दोन्ही प्रमुख नेते एकत्रित बसून तोडगा काढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.