मुंबईच्या महापौरपदावरून ठाकरे आणि भाजपमध्ये बोलणी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपने 2017 साली शिवसेनेच्या महापौरासाठी माघार घेतली होती. आता तीच रणनीती वापरून ठाकरे गट भाजपच्या महापौर निवडीवेळी गैरहजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे भाजपचा महापौर सहज निवडून येईल.