मुंबई महापौरपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने कोकण आयुक्तालयाकडे आपल्या गटाची नोंदणी अद्याप केलेली नाही, हे त्याचे प्रमुख कारण आहे. प्रशासनाने प्रक्रिया स्थगित केली असून, ३१ जानेवारीला होणारे मतदान रद्द झाले आहे. आता नवीन महापौरांची निवड फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे.