मुंबईतील गोरेगाव पूर्व रहेजा हाईट्स आणि आयटी पार्क परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या दिसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा रहेजा हाइट्समध्ये एक बिबट्या आला होता. काल संध्याकाळीसुद्धा लोकांनी त्याला याच सोसायटीत पाहिले. तो जवळच्या बागेतही येतो, असे लोकांचे म्हणणे आहे.