मुंबईत मुसळधार पावसामुळे आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. पावसाचा जोर लक्षात घेता हा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मुंबई विद्यापीठासह संलग्न असलेल्या ३२ परीक्षा रद्द झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे.