मुंबईतील मालाड पूर्व भागात असणाऱ्या गोकुळधाम फिल्म सिटी रोडवर एका खाजगी क्लासमध्ये शिक्षकेनं 8 वर्षाच्या विद्यार्थ्याला मेणबत्तीचे चटके दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याचं कारण म्हणजे या विद्यार्थ्याचं खराब हस्ताक्षर... हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर शिक्षिकेविरोधात (जयश्री राठोड) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार मुस्तकिन खान हे मालाड पूर्वेच्या पिंपरीपाडा येथे राहतात. त्यांचा मुलगा मोहम्मद हमजा खान हा लक्षधाम शाळेत तिसर्या इयत्तेत शिकतो.