राज्यातील 11 महापालिकांमध्ये महायुती, तर 18 ठिकाणी इतर पक्षांमध्ये आमनेसामने लढत होणार आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मुंबईत 227 जागांसाठी भाजप-शिंदे गट, काँग्रेस-वंचित-रासप, आणि उद्धव ठाकरे-मनसे-शरद पवार गट यांच्यात प्रमुख लढत होईल. अजित पवार गट अनेक ठिकाणी स्वतंत्र लढणार आहे.