सकाळी मरिन ड्राईव्हवर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ यांना सकाळी जॉगिंग करताना पाहून मुंबईकरांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. अनेकांना त्यांना ओळखले नाही तर काहींनी त्यांचा व्हिडीओ मोबाईलवर चित्रित केला. भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ यांचा हा अनोखा अंदाज मुंबईकरांना पाहायला मिळाला.