छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील आठवडी बाजार बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हे सर्व बाजार जुने आणि ऐतिहासिक म्हणून ओळखले जातात. या निर्णयामुळे अनेक छोट्या व्यापाऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. छावणी, सोमवार–रविवार बाजार आणि चिक्कलठाणा येथील आठवडी बाजार बंद होणार असून, यामुळे हजारो विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे.