मुंबईतील दादर इथल्या मीनाताई ठाकरे फुल मार्केटबाहेर महानगर पालिकेनं धडक कारवाई केली. यावेळी फूल विक्रेत्यांच्या वस्तूंचं मोठं नुकसान झालं. महानगर पालिकेचे अधिकारी आणि फूल विक्रेते व्यापारी यांच्यात बाचाबाची झाली. अतिक्रमण हटवताना थेट शेतकऱ्यांच्या मालावर जेसीबी फिरवल्याचा व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आरोप केला.