नंदुरबार नगरपालिकेकडून आज शहरातील कोरीट नाका परिसरात मुख्य नाल्यावर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. या मोहिमेत जवळपास सहा दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात आले. कोरीट नाका परिसरातील मुख्य नाल्याच्या जागेवर काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे पावसाळ्यात नाले वारंवार तुंबण्याच्या समस्या निर्माण होत होत्या.