पंढरपूरातील विठ्ठल मंदिर परिसरातील वाढत्या अतिक्रमणांवर अखेर नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे मंदिर परिसरातील रस्ते मोकळे झाले असून भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. अधिक मास आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता विठ्ठल मंदिर परिसरातील रस्ते अपुरे पडत आहेत.