मुरबाड मधील सोनार पाडा जिल्हा परिषद शाळेतील रस्त्यावर गटाराचे पाणी आल्याने विद्यार्थ्यांना जायला रस्ता नाही. सोनार पाडा जिल्हा परिषद शाळेला चारही बाजूने गटाराच्या पाण्याने वेढा दिल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना गटाराच्या पाण्यातून वाट काढत यावे लागते.