प्रसिद्ध अभिनेते मुरली शर्मा यांनी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे माघी गणेशोत्सवानिमित्त वन साईडच्या विघ्नहर्ता मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेतले. बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांमधील खलनायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शर्मांना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. यावेळी त्यांनी मनोभावे आरती केली आणि प्रजासत्ताक दिनी मिळालेल्या दर्शनाबद्दल आनंद व्यक्त करत देशभक्तीपर भावना मांडल्या.