वाढत्या उष्णतेचा फटका खरबूज उत्पादकांना बसला आहे. जळगावातील मुक्ताईनगरमध्ये खरबुजाचे मळे उद्ध्वस्त झाले आहेत. हातातोंडाशी आलेलं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाया गेलं आहे. जिल्ह्यातही ठिकठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. खराब झालेल्या खरबुजामुळे शेतकऱ्यांनी लावलेला खर्चही यावर्षी निघाला नाही.