पावसासाठी जळगावात मुस्लिम बांधवातर्फे देवाकडे प्रार्थना करण्यात आली. ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवातर्फे नमाज-ए-इस्तका अदा करण्यात येऊन पावसासाठी अल्लाला साकडे घालण्यात आले. यावेळी नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवाची उपस्थिती होती. जून महिना संपत आला तरी अद्याप पाऊस झालेला नसल्याने सर्वांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.