रब्बी हंगामात यावर्षी वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोहरी पिक पेरणीला पसंती दिली आहे. बाजारात मिळत असलेल्या हमिभावामुळे यावर्षी वाशीम जिल्ह्यात 500 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर मोहरीची पिकाची पेरणी केली आहे. पोषक वातावरणामुळे आता मोहरी पिक बहरू लागल आहे. हरभरा गहू तूर पिका पेक्षा खर्च कमी आणि मोठ्या उत्पनाची हमी असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी शेतकऱ्यांनी मोहरी पीक घेणे पसंत केले आहे.