वाशिम जिल्ह्यात मोहरी लागवडीखालील क्षेत्रात घट झाली असली तरी, यंदा मर्यादित क्षेत्रातील पिके बहरात आली आहेत. अनुकूल हवामान आणि वेळेवर व्यवस्थापनामुळे पिवळ्या फुलांनी डवरलेली शेतं लक्ष वेधून घेत आहेत. शेतकरी चांगल्या उत्पादनाच्या आशेने उत्साहित असून, या जोमदार पिकाने जिल्ह्यात सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे.