लहान रकमेतून मोठी संपत्ती निर्माण करणे शक्य आहे. आर्थिक शिस्त आणि नियमित गुंतवणुकीद्वारे तुम्ही हे साध्य करू शकता. म्युच्युअल फंड एसआयपी हा एक सोयीस्कर मार्ग आहे, जिथे दररोज ₹200 गुंतवून तुम्ही 12 वर्षांमध्ये ₹20 लाखांहून अधिकचा निधी तयार करू शकता. दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो.