विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी काल बनियान आणि टॉवेल परिधान करून चड्डी-बनियन गँगचा निषेध म्हणत आंदोलन केले होते. त्यानंतर आज महाविकास आघाडीने (मविआ) आज सरकारविरोधात अनोखे आंदोलन केले. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या वर्तनाचा निषेध करण्यासाठी मविआच्या आमदारांनी हाती भोपळा घेत अनोखंच आंदोलन केलं.