इंधनाच्या वाढत्या दरांचा फटका आता थेट शेतकऱ्यांच्या खिशाला बसू लागला आहे. नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर मशागत, बियाणे, खते आणि रोपांच्या खर्चात मोठी वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. डिझेलच्या दरवाढीमुळे शेतजमिनीची मशागत करण्यासाठी लागणारा खर्च एकरी सुमारे वीस हजार रुपयांवरून तीस हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे.