परंपरेनुसार आजही डोंबिवलीत म्हात्रे परिवाराच्या घरी नागदेवताने दर्शन दिले. पूजा आरती ओवाळणी होईपर्यंत नागदेवता फणा काढून होते. हार, फुलं, कुंकू, हळद लावतानाही नागदेवता हलले नाहीत. सर्प मित्र सुभाष म्हात्रे हे गेली 87 वर्षे सिमेंटच्या जंगलात सर्प पकडून ते झाडांच्या जंगलात सोडतात. विशेष करुन नागपंचमीला पकडलेले साप घरी आणून ते त्यांची काळजी घेतात. गेली अनेक वर्षे नाग देवता ही पूजा स्वीकारतात आणि पूजा पूर्ण होईपर्यंत जागेवरून हलत नाहीत.