तळकोकणात आज नागपंचमी उत्साहात साजरी होत असून घरोघरी शाडूमातीपासून बनविलेल्या नागमुर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीला विशेष ओळख आहे. पारंपरिक सण-उत्सवातील धार्मिकता जोपासणारा आणि प्राण्यांविषयी प्रेमभावना, निसर्ग-संवर्धन आणि सामाजिक एकोपा निर्माण करणारा सण म्हणूनही नागपंचमीकडे पाहिले जाते.