महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या निकालांमध्ये भाजपने मोठे यश संपादन केले आहे. नागपूरसह विदर्भात भाजपने आपले वर्चस्व सिद्ध करत जल्लोष साजरा केला. भाजपने १०७ जागांवर विजय मिळवला, तर शिवसेना ४८ जागांसह दुसऱ्या स्थानी राहिली. धर्माबादमध्ये मराठवाडा जनहित पक्षाने सहा जागा जिंकल्या आहेत.