मंत्री भरत गोगावलेंनी कार्यकर्त्यांसोबत नगर परिषद निकालाचा जल्लोष साजरा केला. श्रीवर्धनमध्ये अतुल चौगुले ठाकरेंच्या शिवसेनेतून नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत, मात्र त्यांचा लवकरच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश अपेक्षित आहे. निवडणुकांच्या निकालानंतर लगेच पक्षबदल होण्याची ही दुर्मिळ राजकीय घडामोड श्रीवर्धनमध्ये पाहायला मिळाली.