नागपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनीकडून शाळेच्या अधीक्षकांच्या घरचं घरकाम करून घेतलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील सावळी इथल्या विद्याभारती आदिवासी आश्रम शाळेतील ही घटना आहे.