नागपूरच्या अजनी परिसरातील गजानन उद्यानात चक्क गांजाच्या झाडांची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भाजप नेते मुन्ना यादव यांनी या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याने मनपा प्रशासन आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. गजानन उद्यानात 16 ते 19 वयोगटातील मुले आणि तरुण गांजा पिऊन धुमाकूळ घालत असल्याची तक्रार नागरिकांनी पोलिसांकडे केली होती.