नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीचा सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर विकास करण्याच्या दृष्टीने कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने विकासाचे डिझाईन तयार करण्यासाठी तज्ज्ञ कंत्राटदारांकडून निविदा मागवल्या आहेत. दीक्षाभूमीचे वर्ल्ड क्लास डिझाईन तयार करण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नियुक्त केला जाणार आहे.