नागपूरमध्ये उपचार सुरू असलेल्या मध्यप्रदेशातील तीन बालकांचा कफ सिरपमुळे मृत्यू झाला आहे. गेल्या १६ तासांत ही घटना घडली असून, आतापर्यंत कफ सिरपमुळे झालेल्या बालकांच्या मृत्यूची संख्या १६ वर पोहोचली आहे. नागपूर मेडिकलमध्ये आणखी तीन बालके चिंताजनक अवस्थेत उपचार घेत आहेत. ही घटना गंभीर असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.