भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे प्रतीक असलेला सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाच्या घरी जाऊन त्याला औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते. हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही आपल्या भगिनी ज्योती ठोसरे यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली. यावेळी बहिणीने त्यांचे औक्षण करून त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने देशमुख कुटुंबीयांनी दिवाळीचा आनंद साजरा केला