विदर्भाचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या श्री टेकडी गणेश मंदिर येथे 750 किलो चांदी व अर्धा किलो सोन्याने सजवलेल्या भव्य सिंहासनाचे लोकार्पण आज संकष्टी चतुर्थीच औचित्य साधून करण्यात आल. या सिंहासनावर श्री गणेश रिद्धी-सिद्धीसह विराजमान आहेत. संपूर्ण चांदीच्या सिंहासनाला 500 ग्रॅम सोन्याचा मुलामा देण्यात आला असून त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्याच्या वैभवात भर पडली आहे.