महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांचा सत्कार केला आहे. जागतिक महिला बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल त्यांना हे पारितोषिक मिळालं. दिव्याने तिच्या उत्कृष्ट कामगिरीने देशाचा गौरव वाढवला असून, राज्य सरकारकडून तिला तीन कोटी रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित कऱण्यात आलंय. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दिव्या देशमुखच्या या यशाचं कौतुक केलं आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.