कामठी नगरपरिषदेत भाजपने तब्बल ४० वर्षांनंतर ऐतिहासिक विजय मिळवला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपच्या भव्य विजयी रॅलीत कडाक्याच्या थंडीतही हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अजय अग्रवाल यांच्या विजयामुळे कामठीत उत्साहाचे वातावरण आहे. या विजयाने नागपूर जिल्ह्यातील भाजपची ताकद अधोरेखित झाली आहे.