नागपुरातील राजभवनचे नाव बदलून आता लोकभवन असे करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यपालांना याबाबत सूचना दिल्या होत्या. या नामकरणामुळे राजभवनाला नवीन ओळख मिळाली असून, आता लोकभवन असा नवीन फलकही लावण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी येथे रंगरंगोटीचे कामही सुरू आहे.