ढाबे-हॉटेलमध्ये अवैध दारू पुरवठ्यावर नागपूर पोलिसांच्या परिमंडळ ४ कडून कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ३० अधिकारी, १०० पोलिस, आणि आरसीपी प्लॅटूनचा सहभाग आहे. ढाबे, हॉटेल, लॉजवर अचानक धाडी, अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा फोकस आहे. दारूबंदी कायद्यान्वये २० प्रकरणे नोंदवत एकूण १००हून अधिक कारवाया करण्यात आल्या.