नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरात CJP कडून शासकीय शाळांमधील मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. CJP च्या स्कूल ठीक करो अभियानाच्या टीमने काटोल तालुक्यातील लाडगाव येथे शाळा पाहणीसाठी गेली होती. टीम शाळेची पाहणी करत असताना पोलिसांनी टीमला थांबवून शाळेची पाहणी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. आम्ही प्रशासन, शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक यंत्रणांचा सन्मान राखूनच प्रत्येक शाळेची पाहणी करत असल्याचा CJP पदाधिकाऱ्यांचं मत आहे.