नागपूरमध्ये आचारसंहितेदरम्यान तहसील पोलिसांनी रेशीमबागजवळ एका संशयिताकडून ९ लाखांची रोकड जप्त केली आहे. दिलीप ठक्कर नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. ही रक्कम निवडणुकीच्या गैरवापरासाठी आणली होती का, याचा तपास सध्या सुरू आहे. तहसील पोलिसांनी गांधीबाग झोनच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे.