सेवानिवृत्ती कार्यक्रम संपताच कोसळले छत, नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर ही घटना घडली. गुरुवारी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम पार पडला आणि काही वेळेत नंतर टीटीई लॉबीतील पीओपीचे छत खाली कोसळले. सुदैवाने कार्यक्रम संपल्यामुळे सर्वजण बाहेर निघाल्याने कोणीही जखमी झाले नाही. नागपूरचे सीटीई श्रीकांत वाघ आणि सेवाग्रामचे हेड टीटीई शांतीलाल यांना या कार्यक्रमात निरोप देण्यात आला. मात्र कार्यक्रम आटोपल्यानंतर अचानक लाउंजचे छत कोसळले, प्लास्टर जागोजागी पडून गेले , मात्र कर्मचारी उपस्थित नसल्याने कोणालाही दुखापत झाली नाही