नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील कोकणागड फाट्यावर ट्रकने धानाचे पोते भरलेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टर पलटी होऊन धान रस्त्यावर विखुरले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे भंडाऱ्याजवळील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली.