नालासोपाराच्या आचोळे येथील मुख्य रस्त्यावर पालिकेची कचऱ्याची गाडी गटाराच्या झाकणात अडकल्याची घटना घडली आहे. आज सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेत कोणलाही दुखापत झालेली नाही. पालिकेची कचऱ्याची गाडी कचरा भरून जात असताना अचानक गाडीचे चाक कचऱ्याच्या झाकणात अडकले. थोड्या वेळातच पालिकेच्या घनकचरा विभागाने क्रेनच्या माध्यमातून कचऱ्याची गाडी गटातून बाहेर काढली.